Join us  

ऊर्जित पटेल यांना समन्स, वित्तीय सचिवाची झाली चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 5:38 AM

बँकांमधील घोटाळ्यांप्रकरणी संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना १७ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : बँकांमधील घोटाळ्यांप्रकरणी संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना १७ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील अर्थविषयक स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत वित्तीय सेवा सचिव राजीवकुमार यांना बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. समितीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, आम्ही गव्हर्नरांना बोलावले आहे. बँकिंग नियामकीय मुद्द्यांबाबत प्रश्न विचारणार आहोत.नेमके काय अधिकार?बँकांवर कारवाई करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पुरेसे अधिकारच नाहीत, असे वक्तव्य पटेल यांनी अलीकडेच केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना समितीसमोर बोलावण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गव्हर्नरांना कोणते अधिकार हवे आहेत, हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो, असे समितीच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक