Join us  

ट्रम्प यांनी बरखास्त केल्या समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:48 AM

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दोन व्यावसायिक सल्लागार परिषदाच बरखास्त करून टाकल्या आहेत

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दोन व्यावसायिक सल्लागार परिषदाच बरखास्त करून टाकल्या आहेत. ट्रम्प यांनी गो-या  श्रेष्ठत्ववाद्यांच्या हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ या समित्यांच्या अनेक मुख्य कार्यकारी अधिका-यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.ट्रम्प यांनी राष्टÑाध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर १६ सदस्यीय वस्तू उत्पादन सल्लागार समिती स्थापन केली होती. त्याआधी राष्टÑाध्यक्षपदी निवडून आल्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी व्यूहरचना व धोरण मंच नावाची एक समिती स्थापन केली होती. या दोन्ही समित्या आता बरखास्त केल्या. ट्रम्प यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की, वस्तू उत्पादन समिती आणि व्यूहरचना व धोरण मंचवरील व्यावसायिकांवर दबाव टाकण्याऐवजी मी या दोन्ही संस्था बरखास्त करीत आहे. (वृत्तसंस्था)>हिंसाचारास दोन्ही बाजूंचे लोक जबाबदारया हिंसाचारावर ट्रम्प यांचा प्रतिसाद गोºया वंशवाद्यांचे समर्थन करणारा होता, असे आरोप झाल्यानंतर बहुतांश सीईओंनी राजीनामे दिले होते. आणखी काही सीईओ समितीला सोडचिठ्ठी देण्याच्या पवित्र्यात होते. शार्लोट्टसव्हिल्लेमधील हिंसाचारास दोन्ही बाजूंचे लोक जबाबदार असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला. कालपर्यंत आठ सीईओंनी राजीनामे दिले होते.