अपंगांचे आज उपोषण
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
सोलापूर: अपंगांना त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी काही विभाग आणि अधिकारी जाणीवपूर्वक अपंगांची हेटाळणी करीत आहेत. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी अपंगदिनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद तांबे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली़
अपंगांचे आज उपोषण
सोलापूर: अपंगांना त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी काही विभाग आणि अधिकारी जाणीवपूर्वक अपंगांची हेटाळणी करीत आहेत. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी अपंगदिनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद तांबे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली़या उपोषणात महासंघाचे अध्यक्ष यशवंत गवळी, रमाकांत साळुंखे, जि़ प़ लिपिकवर्गीय संघटनेचे अध्यक्ष राजेश देशपांडे, सचिन मायनाळे, लक्ष्मण वंजारी, आदम बागवान, पिराजी सुरवसे, नितीन पळसे आदी सहभागी होणार आहेत़ जिल्?ातील शासकीय, निमशासकीय महामंडळे, महापालिका, जिल्हा परिषद, खासगी शाळा, आर्शमशाळा येथे कार्यरत असलेल्या अपंग कर्मचार्यांवर संबंधित विभाग व खातेप्रमुख हे अन्याय करीत असून, अपंगांना सन 1995 च्या पुनर्वसन कायद्याच्या हक्कापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवले जात आह़े याला काही अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या जिल्हा शाखेने केला आह़े