तीन महिन्यांपासून पथदिवे नादुरुस्त! मनपाचा विद्युत विभाग झोपेत
By admin | Updated: November 1, 2014 23:14 IST
अकोला: पथदिव्यांच्या तक्रारीसाठी अकोलेकरांना हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देणार्या मनपाच्या विद्युत विभागाचे कामकाज चव्हाट्यावर आले असून, जुने शहरातील अत्यंत वर्दळीचा पॉप्युलर बेकरी ते श्रीवास्तव चौकपर्यंतच्या मार्गावरील पथदिवे मागील तीन महिन्यांपासून नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे. खांब क्रमांक सीपी-२ सह इतरही पथदिवे बंद असून, परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे.
तीन महिन्यांपासून पथदिवे नादुरुस्त! मनपाचा विद्युत विभाग झोपेत
अकोला: पथदिव्यांच्या तक्रारीसाठी अकोलेकरांना हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देणार्या मनपाच्या विद्युत विभागाचे कामकाज चव्हाट्यावर आले असून, जुने शहरातील अत्यंत वर्दळीचा पॉप्युलर बेकरी ते श्रीवास्तव चौकपर्यंतच्या मार्गावरील पथदिवे मागील तीन महिन्यांपासून नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे. खांब क्रमांक सीपी-२ सह इतरही पथदिवे बंद असून, परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे.शहराच्या मुख्य मार्गांसह विविध भागात नादुरुस्त पथदिव्यांची समस्या कायम आहे. पथदिव्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासन थातूर मातूर उपाययोजना करीत आहे. पथदिवे देखभाल दुरुस्तीचा कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांचे मागील सहा महिन्यांपासून देयक थकीत असल्याने कंत्राटदारांनी आखडता हात घेतला. त्याचे परिणाम समोर येत असून, प्रमुख रस्त्यांसह विविध भागातील पथदिवे सतत बंद राहत असल्याची स्थिती आहे. जुने शहरातील विठ्ठल मंदिर मार्गावरील पॉप्युलर बेकरी ते श्रीवास्तव चौकपर्यंतचे पथदिवे बंद आहेत. यामध्ये प्रभाग क्र.११ अंतर्गत येणार्या विद्युत खांब क्रमांक सीपी-२ सह इतर खांबावरील पथदिवे सलग तीन महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी संबंधित नगरसेवकांसह मनपाच्या विद्युत विभागाला वारंवार सूचना केल्यावरदेखील पथदिवे सुरू करण्याची तसदी अद्यापपर्यंत घेतली नसल्याची माहिती आहे. मनपा प्रशासन मूलभूत सुविधा देण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करीत नागरिकांनी मालमत्ता कर, पाणीपी जमा न करण्याचा निर्णय घेतला आहे.