Join us  

२०१८-१९ च्या नवीन आयकर रिटर्नमध्ये १५ मुख्य बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 7:20 AM

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, नवीन आयटीआर फॉर्म सीबीडीटी (सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्स)ने सूचित केला आहेत, तर त्यावर तुमचे काय मत आहे?

- सी.ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, नवीन आयटीआर फॉर्म सीबीडीटी (सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्स)ने सूचित केला आहेत, तर त्यावर तुमचे काय मत आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, अलीकडेच सीबीडीटीने आयटीआर २०१८-१९ मध्ये नवीन बदल सूूचित केले आहेत. आता करदात्यांना शेती उत्पन्न, धंद्यातील ढोबळ नफा आणि निव्वळ नफा, ज्या कंपन्यामध्ये ते संचालक आहेत, त्या कंपन्यांचा, असूचिबद्ध कंपन्यांमधील शेअर होल्डिंग इत्यादी, यांचा तपशील देणे आवश्यक आहे.अर्जुन : कृष्णा, या नवीन आयटीआरमध्ये कोणते १५ मुख्य बदल आहेत?कृष्ण : अर्जुना, या नवीन आयटीआरमध्ये खालीलप्रमाणे मुख्य बदल आहेत.१. प्रत्येक व्यापाऱ्याला आयटीआर - ३, आयटीआर -५ आणि आयटीआर - ६ मध्ये ज्यांनी खात्याची पुस्तके ठेवली आहेत, त्यांना मॅन्युफॅक्चरिंग खाते, ट्रेडिंग खाते आणि नफा व तोटा खाते यांचे संपूर्ण विश्लेषण देणे आवश्यक आहे. मॅन्युफॅक्चरिंग खात्यामध्ये कच्च्या मालाचा ओपनिंग स्टॉक, वर्क इन प्रोग्रेस, खरेदी, थेट वेतन, थेट खर्च, कारखाना खर्च आणि क्लोजिंंग स्टॉक यांचा संपूर्ण तपशील देणे आवश्यक आहे, तसेच उत्पादित वस्तूंंची किंमत ही ट्रेडिंग खात्याला ट्रान्स्फर करावी लागेल. ट्रेडिंग खात्यामध्ये खरेदी विक्री, थेट खर्च, विक्रीस तयार झालेल्या वस्तूंंचा ओपनिंंग आणि क्लोजिंंगचा स्टॉक यांचा संपूर्ण तपशील देणे आवश्यक आहे. ढोबळ नफा हा नफा व तोटा खात्याला ट्रान्स्फर करावा लागेल. नफा व तोटा खात्यामध्ये अप्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्च द्यावा लागणार आहे. हे ढोबळ नफा व निव्वळ नफा याला उघड करील व खात्याच्या पुस्तकांशी सुसंगत करावा लागेल.२. जर निव्वळ कृषी उत्पन्न रु. ५ लाखांपेक्षा जास्त असेल, तर आयटीआर-२, आयटीआर-३, आयटीआर-५, आणि आयटीआर-६ मध्ये, प्रत्येक कृषी जमिनीविषयी खालील माहिती द्यावी लागेल.अ) जिल्ह्याचे नाव पिन कोडसह, ज्यात कृषी जमीन आहे.ब) एकरमध्ये शेतीचे मापन.क) शेतजमीन मालकीची आहे किंवा भाड्यावर आहे.ड) शेतीची जमीन सिंचनावर किंवा पावसावर अवलंबून आहे का.यावरून पीक पॅटर्न व शेतजमिनीचे उत्पन्न निश्चित करता येईल.३. स्टार्ट-अप आणि असूचिबद्ध कंपन्यांना शेअर होल्डर्स यांची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे, तसेच संपत्ती आणि दायित्व, यांचा अहवाल त्यांचा वापराच्या हेतुसहित सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.४. वर्षभरात असूचिबद्ध कंपन्यांमधील इक्विटी शेअर्ससंदर्भात माहिती आयटीआर- २, आयटीआर-३, आयटीआर-५ आणि आयटीआर- ७ मध्ये सविस्तर द्यावी लागेल.५. जो करदाता कंपनीमध्ये संचालक पदावर आहे त्याला आयटीआर-२ आणि आयटीआर-३ मध्ये त्याचे नाव, कंपनीचे पॅन, त्याचे सूचिबद्ध आणि असूचिबद्ध शेअर्स आणि डीआयएन द्यावा लागणार आहे.६. जो करदाता आयटीआर-२ आणि आयटीआर- ३ दाखल करीत असेल, तर त्याला त्याच्या रहिवासी स्थितीचा संपूर्ण सादरीकरण देणे आवश्यक आहे. म्हणजेच करदाता वर्षातून १८२ दिवस किंवा जास्त भारतात निवासी होता का? आणि ३६५ दिवस किंवा जास्त मागील ४ वर्षांमध्ये भारताचा निवासी होता का? हे करदात्याचे रहिवासी स्थिती व करपात्रता निश्चित करण्यासाठी मदत करील.७. आता आयटीआर-३, आयटीआर-५ आणि आयटीआर-६ भरणाºया करदात्यालासुद्धा जीएसटी नं. आणि जीएसटी रिटर्ननुसार दाखविलेली उलाढालीची संपूर्ण माहिती द्यायची आहे.८. आता पगार उत्पन्नाच्या अहवालात बदल झाला आहे. पूर्वी केवळ करपात्र भत्त्याचा अहवाल दिला जात होता. आता संपूर्ण पगार, सवलत भत्त्याची कपात आणि करपात्र पगार यांचा अहवाल देणे आवश्यक आहे.९. इक्विटी आणि इक्विटी म्युच्युअल फंडवरील लॉग टर्म कॅपिटल गेन ज्याच्यावर १० टक्के कर लागणार आहे त्याला संपूर्ण माहिती द्यावी लागेल. हा कर ११२ ए विभागात १ एप्रिल २०१८ पासून लागू झालेला आहे.१०. ८० जी च्याअंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी देणगीचे विभाजन नगद किंवा इतर स्वरूपात द्यायचे आहे. रु. २,००० पेक्षा जास्त नगद देणगी नाकारली जाईल.११. जर भाडे उत्पन्नावर टेडीएस होत असेल, तर भाडे करूचा टॅन देणे गरजेचे आहे, तसेच जर अचल मालमत्तेची विक्री केली असेल, तर विक्रेत्याचा पॅन/टॅन देणे गरजेचे आहे.१२. ज्येष्ठ नागरिकांना बँक व्याजावर ५० हजारापर्यंत मिळणारी कपात आयटीआरमध्ये ८० टीटीबी विभागात द्यायची आहे.१३. एक व्यक्ती जो एकतर कंपनीमध्ये संचालक आहे किंवा असूचिबद्ध इक्विटी समभांगामध्ये गुंतवणूक केली आहे किंवा कुटुंबाच्या पेन्शनसाठी मानक कपात वगळता अन्य स्रोतांकडून मिळणाºया उत्पन्नातून कपात करण्याचा दावा केला आहे, तो आयटीआर-१ किंवा आयटीआर - ४ दाखल करू शकत नाही.१४. आता आयटीआर-४ हे केवळ निवासी व्यक्ती, एचयूएफ आणि भागीदारी फर्म ज्यांचे ५० लाखांपर्यंत उत्पन्न आहे ते दाखल करू शकतात. ज्यांचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना आयटीआर -३ दाखल करावा लागेल.१५. २०१८-१९ पासून फक्त अतिज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त असेल तेच आयटीआर-१ आणि आयटीआर-४ पेपर रिटर्न दाखल करू शकतात. इतर करदात्यांना इलेक्ट्रॉनिकली दाखल करावे लागेल.>अर्जुन : कृष्णा, करदात्याने नवीन आयटीआर फॉर्ममधून काय बोध घ्यावा.कृष्ण : अर्जुना, कर चोरी तपासण्यासाठी, नवीन कॉम्युटराईज्ड स्क्रुटीन आणि पडताळणी करण्यासाठी व वाढलेल्या आर्थिक व्यवहारासांठी करदात्यांकडून जास्तीत जास्त माहिती घेतली जात आहे, म्हणूनच दरवर्षी आयटीआरमध्ये बदल घडवून आणले जातात. १०० टक्के ई-प्रोसेसिंग, ई-व्हेरिफिकेशन, आणि ई-असेसमेंटची ही एक पायरी आहे.