Join us  

करदाते आता पाहू शकतील जीएसटी विवरणपत्राची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 4:07 AM

नवी दिल्ली : जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) पोर्टलवर दाखल केलेल्या आपल्या विवरणपत्राची स्थिती आता करदाते आॅनलाइनपाहू शकतील.

नवी दिल्ली : जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) पोर्टलवर दाखल केलेल्या आपल्या विवरणपत्राची स्थिती आता करदाते आॅनलाइनपाहू शकतील. जीएसटी नेटवर्कच्या वतीने ही माहिती जारी करण्यात आली आहे. जीएसटीएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जीएसटी पोर्टलवर लॉगइन करणारे सर्व वापरकर्ते (युजर्स) आपल्या सर्व प्रकारच्या विवरणपत्रांची स्थिती पाहू शकतील. जीएसटीआर-१ अथवा जीएसटीआर-३बी यासारख्या कोणत्याही विवरणपत्राची स्थिती वापरकर्त्यांना पाहता येईल. आपण दाखल केलेले विवरणपत्र कोणत्या पातळीवर आहे, हे त्यातून वापरकर्त्यांना समजेल.जीएसटीआर-३बी हे विक्रीचे प्राथमिक विवरणपत्र आहे. येणाºया महिन्याच्या २० तारखेला ते सादर करावे लागते. जीएसटीआर-१ हे अंतिम विक्री विवरणपत्र आहे. १.५ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना तीन महिन्यांतून एकदा जीएसटीआर-३बी हे विवरणपत्र दाखल करावे लागते.