साई इंग्लिश स्कूल शाळेचे सुयश
By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST
डोंबिवली - साई एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित कल्याण मधील साई इंग्लिश स्कूलचा माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा १०० टक्के निकाल लागला आहे. तसेच ९० टक्कयांपेक्षा अधिक गुण मिळवून १५ पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनुराधा सिंग आणि विष्णु भास्करण या विद्यार्थ्यांनी ९४.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर ९४ टक्के गुण मिळवून मंदार खरात द्वितीय, ९३. ४० टकके गुण मिळवून गायत्री मणी हिने तृतीय क्रमांक पटकविला आहे. विद्यालयाचे संस्थापक जी. आर मूर्ति, मैथिली मूर्ति यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जी. आर. मूर्ति यांनी प्रत्येकी १०० रू. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून देण्याचे घोषित केले आहे.
साई इंग्लिश स्कूल शाळेचे सुयश
डोंबिवली - साई एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित कल्याण मधील साई इंग्लिश स्कूलचा माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा १०० टक्के निकाल लागला आहे. तसेच ९० टक्कयांपेक्षा अधिक गुण मिळवून १५ पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनुराधा सिंग आणि विष्णु भास्करण या विद्यार्थ्यांनी ९४.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर ९४ टक्के गुण मिळवून मंदार खरात द्वितीय, ९३. ४० टकके गुण मिळवून गायत्री मणी हिने तृतीय क्रमांक पटकविला आहे. विद्यालयाचे संस्थापक जी. आर मूर्ति, मैथिली मूर्ति यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जी. आर. मूर्ति यांनी प्रत्येकी १०० रू. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून देण्याचे घोषित केले आहे.रेणुका विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यशडोंबिवली - भिंवडी तालुक्यातील वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे रेणुका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झिडके या विद्यालयातील प्रांजल पाटील ९२.४० टक्के गुण मिळवून वजे्रश्वरी केंद्रात व विद्यालयात प्रथम आला आहे. याशिवाय विवेचन गायकवाड ८८.८० टक्के आणि श्वेता पाटील ८७.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. यावर्षी या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९०.४० टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव नरेंद्र एन. पाटील,मुख्याध्यापक आर. आर. शिंदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, पर्यवेक्षक, शिक्षक आणि कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.