Join us  

साई मंदिर परिसरात पाण्याच्या बाटल्यांनाही बंदी तेरा सुरक्षारक्षक निलंबित : आदेशाची नऊ दिवसांनंतर अंमलबजावणी

By admin | Published: June 19, 2014 10:31 PM

शिर्डी (जि़ अहमदनगर) : जगाला मानवतेचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या दरबारात आता मोबाईल नेणे सोपे आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची बाटली नेणे संवेदनशील ठरत आहे़ मंदिरातील दर्शन रांगेत पाण्याच्या बाटल्या आढळून आल्याने जवळपास तेरा कंत्राटी सुरक्षा कर्मचार्‍यांना आठ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे़

शिर्डी (जि़ अहमदनगर) : जगाला मानवतेचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या दरबारात आता मोबाईल नेणे सोपे आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची बाटली नेणे संवेदनशील ठरत आहे़ मंदिरातील दर्शन रांगेत पाण्याच्या बाटल्या आढळून आल्याने जवळपास तेरा कंत्राटी सुरक्षा कर्मचार्‍यांना आठ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे़
९ जून रोजी प्रभारी कार्यकारी अधिकारी म्हणून शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी पदभार स्वीकारला़ पहिल्याच दिवशी मंदिरात गेल्यानंतर त्यांना दर्शन रांगेत पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या़ याची गंभीर दखल घेत त्यांनी दर्शनबारीतील पाच व मंदिरातील आठ महिला रक्षकांवर कारवाईचे आदेश दिले़ आदेशाची तब्बल नऊ दिवसांनी अंमलबजावणी करत कामगार विभागाच्या सूचनेवरुन ठेकेदाराने संबंधित कर्मचार्‍यांना तोंडी आदेशाने गुरूवारी आठ दिवसांसाठी घरचा रस्ता दाखवला़ तर सहा कायम कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या़
वास्तविक दर्शनबारीत संस्थान पाण्याच्या बाटल्यांची विक्री करते़ त्यानंतर शंभर पावलावर सुरक्षा रक्षक या बाटल्या पुन्हा जमा करून घेतात़ एकीकडे दर्शनबारीत बाटल्यांची विक्री करायची व भाविक त्या बाटल्या घेऊन मंदिरात आले तर सुरक्षा रक्षकांवर कारवाई करायची, संस्थानचा हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी केला आहे़
एकीकडे आयबीसारख्या सुरक्षा यंत्रणांनी मंदिरात मोबाईल आणण्यावर प्रतिबंध घातलेला असताना मंदिर परिसरात सर्रास मोबाईल आणले जातात़ मात्र पाण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूवर प्रतिबंध घातले जातात़दर्शनबारीत लहान मुले, वृद्धांना पाण्याची गरज असते़ अनेक भाविक पाण्याअभावी कासावीस होतात, भोवळ येऊन पडतात़ गर्दीत जेव्हा दर्शन रांगा शहरात लांबवर जातात तेव्हा उन्हातान्हात भाविकांना अव्वाच्या सव्वा दराने पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात़ तेव्हा संस्थानची यंत्रणा सावली तर दूर पाण्याचीही सोय करत नाही़ याबाबींकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता कोते यांनी व्यक्त केली आहे़ (वार्ताहर)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़