Stock Market Today: आज आठवड्यातील दुसरे ट्रेडिंग सत्र आहे आणि आज निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. एक्सपायरी दिवशी, निफ्टी ८७ अंकांनी घसरून २६,०८८ वर पोहोचला, तर सेन्सेक्स ३१६ अंकांनी घसरून ८५,३२५ वर पोहोचला. तर दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. आज, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८९.९७ चा नवा नीचांक गाठला आणि तो कोणत्याही क्षणी ९० च्या खाली येण्याची शक्यता आहे. गेल्या सलग दोन सत्रांपासून बाजार रेड झोनमध्ये बंद होत आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. सोमवारी, निफ्टीनं २६,३२५ चा उच्चांकही गाठला.
कामकाजादरम्यान सेन्सेक्स ८५,५०० वर ट्रेड करत होता. सेन्सेक्सच्या टॉप ३० स्टॉकपैकी, प्रत्येकी १५ स्टॉक ग्रीन आणि रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत. एशियन पेंट्स, भारती एअरटेल आणि इन्फोसिस हे टॉप गेनर आहेत, तर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि बजाज फिनसर्व्ह हे टॉप लूझर्स आहेत.
'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरु किती आहेत श्रीमंत? चुपचाप केलं असं काम की होतेय चर्चा?
बाजारासाठी महत्वाचे घटक
सध्याच्या बाजाराच्या महत्वाच्या घटकांबाबत बोलायचं झालं तर, भारतीय रिझर्व्ह बँक या आठवड्यात आणि फेडरल रिझर्व्ह पुढील आठवड्यात त्यांचं चलनविषयक धोरण जाहीर करेल. दोन्ही मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात कपात अपेक्षित आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. तर दुसरीकडे या महिन्यात ₹३०,००० कोटी किमतीचे २५ आयपीओ येणार आहेत. याचा दुय्यम बाजारपेठेतील लिक्विडीटीवर परिणाम होईल.
