Join us  

बापरे! राज्य सहकारी बॅँकेला ३२५ कोटींचा निव्वळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 2:01 AM

बॅँकेचा निव्वळ नफा ३२५ कोटी रुपये असल्याची माहिती बॅँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेला मार्च २०२० अखेर संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये १३४५ कोटी रुपयांचा एकूण नफा झाला असून, बॅँकेचा निव्वळ नफा ३२५ कोटी रुपये असल्याची माहिती बॅँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये बॅँकेने केलेल्या प्रगतीची माहिती देताना अनास्कर यांनी सांगितले की, बॅँकेच्या १०९ वर्षांच्या इतिहासात यंदा अनेक विक्रम झाले आहेत.बँकेने अनुत्पादक कर्जांसाठी प्रथमच १०० टक्के तरतूद केल्यामुळे बँकेचा एनपीए आता शून्य टक्के झाला आहे. कोविड १९च्या पार्श्वभूमीवर बँकेने आपल्या सर्व कर्जदारांसाठी ‘आत्मनिर्भर’ कर्जयोजना आखली आहे. याद्वारे एकूण येणे कर्जाच्या २५ टक्के रक्कम सवलतीच्या योजनेने उपलब्ध होणार असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.>गेली सहा वर्षे बॅँक आपल्या सभासदांना १० टक्के दराने लाभांश देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बँकेचा स्वनिधी ४७८४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण १३.११ टक्के असून, ते रिझर्व्ह बॅँकेच्या निकषापेक्षा अधिक आहे.