Join us

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसाठी मानके

By admin | Updated: November 10, 2014 03:31 IST

सरकारने मोबाईल फोनसह एकूण १५ इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसाठी अनिवार्य मानदंड अधिसूचित केले आहेत. देशात मुख्यत: कमी गुणवत्ता असलेल्या उत्पादनांवर

नवी दिल्ली : सरकारने मोबाईल फोनसह एकूण १५ इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसाठी अनिवार्य मानदंड अधिसूचित केले आहेत. देशात मुख्यत: कमी गुणवत्ता असलेल्या उत्पादनांवर अंकुश घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाने शुक्रवारी या उत्पादनांसाठीच्या मानदंडांबाबत अधिसूचना जारी केली आहे. मानदंडांच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांची मुदत कंपन्यांना देण्यात आली आहे. पॉवर अडॉप्टर वा चार्जर, आॅडिओ, व्हिडिओ व अशा प्रकारची अन्य इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, यूपीएस, कॉपी मशीन, स्मार्ट कार्ड रीडर्स, पासपोर्ट रीडर्स आदी उत्पादनांसाठी हे मानदंड आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)