Join us  

लघू उद्योगांना २०० पैकी १०७ गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:10 AM

देशाच्या एकूण निर्यातीपैकी ३४ टक्के भागीदारी असलेले मध्यम व लघू उद्योग क्षेत्र २०० पैकी १०७ गुणांच्या वेगाने समोर जात आहे. क्रिसिल आणि सिडबी या दोन संस्थांनी तयार केलेल्या निर्देशांकातून हा आकडा समोर आला आहे.

नवी दिल्ली : देशाच्या एकूण निर्यातीपैकी ३४ टक्के भागीदारी असलेले मध्यम व लघू उद्योग क्षेत्र २०० पैकी १०७ गुणांच्या वेगाने समोर जात आहे. क्रिसिल आणि सिडबी या दोन संस्थांनी तयार केलेल्या निर्देशांकातून हा आकडा समोर आला आहे.क्रिसिल ही देशातील कर्जदारांचे मानांकन तयार करणारी संस्था आहे, तर सिडबी ही छोट्या उद्योगांना वित्तसाहाय्य पुरविणारी बँक आहे. या दोघांनी मिळून देशातील मध्यम व लघू उद्योगांसंबंधी ‘क्रिसिडेक्स’ हा विशेष निर्देशांक तयार केला आहे. ८ कोटी रोजगार निर्माण करणारे देशातील मध्यम व लघू उद्योग क्षेत्र कसे कार्य करीत आहे, हे या निर्देशांकामुळे सिद्ध होणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या निर्देशांकाचे उद्घाटन केले. सिडबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मुस्तफा व क्रिसिलचे सीईओ आशू सुयश या वेळी उपस्थित होते.>दर दोन महिन्यांनी होणार अभ्यासक्रिसिल व सिडबीने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर देशातील ११०० लघू व मध्यम उद्योगांचा सप्टेंबर-आॅक्टोबरमधील व्यवसायांचा अभ्यास केला. त्यानुसार, एकूण २०० गुण निश्चित केले. त्यामध्ये या ११०० प्रमुख उद्योगांनी १०७ गुण प्राप्त केले. यानंतर, आता दर २ महिन्यांनी असा अभ्यास केला जाणार असून, त्याद्वारे देशातील लघू व मध्यम उद्योगांचे चित्र मांडले जाणार आहे.