Join us

पर्यटनाचे सहा नवे विभाग जाहीर होणार

By admin | Updated: July 24, 2015 00:07 IST

पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नव्या सहा विभागांची निर्मिती करणार आहे. पर्यटकांना जास्तीत जास्त

नवी दिल्ली : पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नव्या सहा विभागांची निर्मिती करणार आहे. पर्यटकांना जास्तीत जास्त स्थळांना भेट देणे सोपे जावे यासाठी तेथे चांगल्या सोयी-सुविधा तयार करणे हे आमचे ध्येय आहे, असे पर्यटनमंत्री महेश शर्मा म्हणाले. ते गुरुवारी येथे फिक्कीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी सरकारने योजना तयार केली असून, त्यात लवकरच नव्या पर्यटन स्थळांची भर घातली जाईल, असे शर्मा म्हणाले.हे नवे विभाग रामायण सर्किट, डेझर्ट सर्किट, इको सर्किट, विल्डलाईफ सर्किट आणि रुरल सर्किट या नावाने असतील.