डेंग्यूसह कचर्याच्या समस्येविरोधात आंदोलन शिवसेना आक्रमक : विभाग कार्यालयामध्ये कचरा टाकून केला निषेध
By admin | Updated: October 29, 2014 22:37 IST
नवी मुंबई : शहरात पसरलेली डेंग्यू, मलेरियाची साथ व कचर्याच्या समस्येविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. घणसोली विभाग अधिकार्यांच्या दालनामध्ये कचरा टाकून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. डेंग्यूमुळे कोणाचा मृत्यू झाला तर पालिका कार्यालयांमध्ये अस्थी टाकण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला.
डेंग्यूसह कचर्याच्या समस्येविरोधात आंदोलन शिवसेना आक्रमक : विभाग कार्यालयामध्ये कचरा टाकून केला निषेध
नवी मुंबई : शहरात पसरलेली डेंग्यू, मलेरियाची साथ व कचर्याच्या समस्येविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. घणसोली विभाग अधिकार्यांच्या दालनामध्ये कचरा टाकून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. डेंग्यूमुळे कोणाचा मृत्यू झाला तर पालिका कार्यालयांमध्ये अस्थी टाकण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला. नवी मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून डेंग्यू व मलेरियाची साथ पसरली आहे. घणसोली, तळवली परिसरामध्ये शेकडो नागरिक तापाने फणफणले आहेत. महापालिकेच्या व खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. शहरात कचर्याची समस्याही गंभीर होवू लागली आहे. महापालिका प्रशासन याविषयी कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. पालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात शिवसेनेने बुधवारी घणसोलीमध्ये आंदोलन केले. विभाग कार्यालयामध्ये जाऊन अधिकार्यांच्या दालनामध्ये कचरा टाकण्यात आला. घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी घणसोलीमधील नागरी आरोग्य केंद्रात जाऊन तेथील अधिकार्यांना डेंग्यू व मलेरियाची साथ रोखण्यासाठीचे निवेदन दिले. पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांच्याशी संपर्क साधून ठोस उपाययोजना करा, जर या आजारामुळे कोणाचा मृत्यू झाला तर मृत व्यक्तीची राख व अस्थी महापालिका अधिकार्यांच्या दालनामध्ये टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये द्वारकानाथ भोईर, घनशाम मढवी, उत्तम म्हात्रे, रेखा म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, ललिता मढवी, लता मढवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. फोटो२०शिवसेना मोर्चा नावाने आहेत