Join us  

शिखा शर्मा पुन्हा अ‍ॅक्सिसच्या सीईओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 3:30 AM

अ‍ॅक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी नेमणूक केली.

मुंबई : अ‍ॅक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी नेमणूक केली. त्यामुळे बँकेला नवा सीईओ मिळेल व शर्मा कदाचित टाटा समूहाकडे जातील या अटकळींना पूर्णविराम मिळाला.शर्मा यांची या पदावरील सध्याची मुदत जून २०१८मध्ये संपत आहे. त्यानंतर आणखी तीन वर्षांसाठी त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय बँकेच्यासंचालक मंडळाने बुधवारी घेतला. तसे शेअर बाजारास कळविले. नियामक संस्थांच्या संमतीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ही फेरनियुक्ती लागू होईल.आयसीआयसीआय प्रुडेन्शियल विमा कंपनीतून आठ वर्षांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेत आल्यापासून शर्मा तेथे या पदावर आहेत.