Join us  

शहा ज्यादा खा गया, राहुल गांधी यांंचा अहमदाबाद बँकेतील ७४५ कोटींवरून अमित शहांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 3:47 AM

अहमदाबाद जिल्हा बँकेत नोटाबंदीनंतरच्या चार दिवसांत जमा झालेल्या ७४५ कोटी मूल्याच्या जुन्या नोटांवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टिष्ट्वटरवरून जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : अहमदाबाद जिल्हा बँकेत नोटाबंदीनंतरच्या चार दिवसांत जमा झालेल्या ७४५ कोटी मूल्याच्या जुन्या नोटांवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टिष्ट्वटरवरून जोरदार टीका केली. ‘लाखो नागरिकांचे कुटुंब नोटाबंदीने उद्ध्वस्त केले असताना, जुन्या नोटा बदलण्यात अमित शहा तुम्ही पहिला क्रमांक पटकावला. शाह ज्यादा खा गया. ५ दिवसांत ७५० कोटी बदलणे हे मोठे यश आहे. त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट,’ अशा शब्दांत राहुल गांधीनी अमित शहा यांना टोला लगावला.नाबार्डने मात्र, अहमदाबाद जिल्हा बँकेत जमा झालेली रक्कम प्रचंड नाही, असा दावा घाईघाईने केला आहे. अमित शहा संचालक असलेल्या या बँकेतील रकमेचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ‘नाबार्ड’ ने सारवासारव केली आहे. या बँकेत १७ लाख खातेदार असून, त्यापैकी १.६० लाख खातेदारांनीच ही रक्कम जमा केली. त्यातही ९८.९४ टक्के खातेदारांनी २.५० लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा केली. प्रत्येक खातेदाराने सरासरी ४६,७९५ रुपये जमा केले. ही रक्कम गुजरातमधील १८ जिल्हा बँकांमधील प्रत्येक खातेदाराने जमा केलेल्या रकमेच्या सरासरीपेक्षाही कमी आहे, असे नाबार्डचे म्हणणे आहे.>काहींची पळवाट; लोकमत मात्र निष्पक्षशहांच्या बँकेसंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्स, न्यू इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स नाऊ, फर्स्ट पोस्ट, न्यूज १८ आदी वृत्तपत्रे व संकेतस्थळांनी प्रसिद्ध वा प्रसारित केले आणि नंतर दबावामुळे अथवा अन्य कारणांमुळे, ते वृत्त काढून घेतले. मात्र ‘लोकमत’ सारख्या अनेक वृत्तपत्रांनी हे वृत्त छापून तसेच संकेतस्थळांवर कायम ठेवून, नि:पक्ष प्रसारमाध्यम ही आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली.

टॅग्स :राहुल गांधी