नवी दिल्ली : सलग सातव्या महिन्यात चलनवाढ नकारात्मक राहिली. खाद्यान्न, इंधन आणि उत्पादित वस्तंूच्या किमती कमी राहिल्यामुळे चलनवाढ उणे (-) २.३६ टक्के नोंदली गेली. येत्या महिन्यांमध्ये मान्सून कशी प्रगती करतो यावर किमतीची परिस्थिती अवलंबून असेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित चलनवाढ गेल्या एप्रिलमध्ये उणे २.६५ टक्के होती. गेल्या नोव्हेंबरपासून चलनवाढीचा वेग हा नकारात्मक आहे. मे २०१४ मध्ये चलनवाढ ६.१८ टक्के होती. यावर्षी कमी मान्सूनचे भाकीत असूनही चलनवाढ कमी होती. भारतीय हवामान खात्याने यंदा १२ टक्के कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता तरी पावसाची सुरुवात वाजवी; पण चांगली झाली. एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढ ४.८७ टक्के होती, ती काहीशी वाढून मे महिन्यात ५ टक्के झाली. सरकारने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या घाऊक किंमत निर्देशांकानुसार भाज्यांच्या किमतीतील चलनवाढ बटाट्याच्या किमतीत ५२ टक्क्यांनी घट झाल्यामुळे उणे ५.५ टक्के होती.
सलग सातव्या महिन्यात चलनवाढ नकारात्मक
By admin | Updated: June 16, 2015 02:50 IST