Join us

सेन्सेक्स, निफ्टी नव्या उंचीवर

By admin | Published: January 24, 2015 1:24 AM

युरोपीय सेंट्रल बँकेने जाहीर केलेल्या उपाय योजनांमुळे शेअर बाजारांत उत्साह संचारला आहे.

मुंबई : युरोपीय सेंट्रल बँकेने जाहीर केलेल्या उपाय योजनांमुळे शेअर बाजारांत उत्साह संचारला आहे. मुंबई बाजाराचा सेन्सेक्स २९,४0८ अंकांच्या, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,८00 अंकांच्या नव्या पातळीवर पोहोचला. दोन्ही निर्देशांकांचा हा नवा उच्चांक ठरला आहे.३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सत्र अखेरीस थोडा खाली येऊन २९,२७८.८४ अंकांवर बंद झाला. २७२.८२ अंकांची अथवा 0.९४ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. सेन्सेक्सच्या तेजीचे हे सलग सातवे सत्र ठरले.५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला निफ्टी ७४.२0 अंकांनी अथवा 0.८५ टक्क्यांनी वाढून ८,८३५.६0 अंकांवर बंद झाला. हा त्याचा सार्वकालिक उच्चांकी बंद ठरला आहे. त्या आधी निफ्टी ८,८६६.४0 अंकांपर्यंत वर चढला होता. बंद होताना तो थोडा खाली आला. नव्या उच्चांकावर बंद होतानाच निर्देशांकांनी आठ महिन्यांतील सर्वोत्तम साप्ताहिक लाभ मिळविला आहे. गेल्या सात दिवसांत सेन्सेक्सने १,९३२.0२ अंक अथवा ७.0६ टक्के लाभ मिळविला. (वृत्तसंस्था)४युरोपियन सेंट्रल बँकेने गुरुवारी उशिरा प्रोत्साहन उपायांची घोषणा केली होती. ही बँक दर महिन्याला ६0 अब्ज युरोंची खरेदी बाजारातून करणार आहे. ही खरेदी सप्टेंबर २0१६ पर्यंत चालणार आहे.