Join us

सेन्सेक्स २९७ अंकांनी घसरला

By admin | Published: April 25, 2015 1:01 AM

आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसची तिमाही कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. त्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरले.

मुंबई : आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसची तिमाही कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. त्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरले. मुंबई शेअर बाजार २९७.0८ अंकांनी घसरून २७,४३७.९४ अंकांवर बंद झाला. हा साडेतीन महिन्यांचा नीचांक ठरला आहे.मार्चला संपलेल्या तिमाहीत इन्फोसिसची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर झाला. या सर्वांचा परिणाम म्हणून बाजारात निराशेचे वातावरण दिसून आले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स २९७.0८ अंकांनी अथवा १.0७ टक्क्यांनी घसरून २७,४३७.९४ अंकांवर बंद झाला. ४ जानेवारी नंतरची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे. गेल्या आठ दिवसांतील ही सातवी घसरण ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९३.0५ अंकांनी अथवा १.११ टक्क्यांनी घसरून ८,३0५.२५ अंकांवर बंद झाला. त्याआधी तो ८,४१३.३0 आणि ८,२७३.३५ अंकांच्या मध्ये झुलताना दिसून आला. इन्फोसिसच्या व्यतिरिक्त सिप्ला, सेसा स्टरलाईट, हिंदाल्को, एलअँडटी, एचडीएफसी, कोल इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज लॅब, गेल, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभागही घसरले. विक्रीच्या दबावात असलेले स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे २.६६ टक्के आणि १.६२ टक्के घसरले. आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. युरोपीय बाजारात सकाळी तेजीचे वातावरण होते. (वृत्तसंस्था)