Join us  

नव्या सीईओचा शोध इन्फोसिससाठी सोपा नाही, जाणकारांचे मत : अनेक इच्छुक प्रक्रियेपासून राहतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 1:16 AM

इन्फोसिसच्या ख्यातनाम संस्थापकांकडून सतत होणाऱ्या निरीक्षणाच्या दडपणामुळे कंपनीला नवा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निवडण्याचे काम सोपे राहिलेले नाही. कारण अनेक नवे इच्छुक या प्रक्रियेपासून स्वत:ला दूर ठेवतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : इन्फोसिसच्या ख्यातनाम संस्थापकांकडून सतत होणाऱ्या निरीक्षणाच्या दडपणामुळे कंपनीला नवा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निवडण्याचे काम सोपे राहिलेले नाही. कारण अनेक नवे इच्छुक या प्रक्रियेपासून स्वत:ला दूर ठेवतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.इन्फोसिसच्या स्थापनेशी संबंध नसलेले विशाल सिक्का हे पहिले सीईओ तीन वर्षांपूर्वी नेमले गेले होते. त्यांनी संस्थापक सतत निंदा करतात, असे कारण देऊन ११ आॅगस्ट रोजी राजीनामा दिला. सिक्का यांच्या राजीनाम्याला इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती हेच जबाबदार असल्याचा ठपका कंपनीच्या संचालक मंडळाने ठेवून नवे मुख्य कार्यकारी अधिकारी ३१ मार्च, २०१८ पर्यंत शोधले जातील, असे म्हटले. उमेदवाराचा शोध कंपनी अंतर्गत तसेच बाहेरही घेतला जाईल.‘आपल्यावर सतत लक्ष ठेवणे आणि जाहीरपणे टीका केली जाणे हे कोणत्याही इच्छुक वा संभाव्य बाहेरील उमेदवाराला आवडणार नाही,’ असे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेसने म्हटले. या पार्श्वभूमीवर कंपनी अंतर्गत उमेदवार जुन्या वरिष्ठांशी निष्ठावंत असल्यामुळे त्याची निवड सोपी असेल, परंतु सक्षमतेशी तडजोड करण्याची जोखीम त्यात आहे, असे द प्रोक्सी या सल्लागार कंपनीने म्हटले.नारायण मूर्ती यांनी गेल्या अनेक महिन्यांत कंपनीत व्यवस्थापनातील अपयशाचे मुद्दे उपस्थित केले होते. याशिवाय इन्फोसिसने २०१५ मध्ये इस्रायलची आॅटोमेशन तंत्रज्ञान कंपनी पनाया २०० दशलक्ष अमेरिकन डॉलरला घेतली होती. हा व्यवहार प्रामाणिकपणे झाला नाही, असाही आरोप झाला होता. नामवंत उद्योजक प्रमोद भसीन यांनी नवा मुख्य कार्यकारी अधिकारी शोधणे हे जरा इन्फोसिससाठी कठीणच आहे, हे मान्य केले. नव्या मुख्य कार्यकारी अधिकाºयाने तसेच संचालक मंडळाने कंपनीच्या इतर भागधारकांचेही काय म्हणणे आहे हे ऐकून घेणे महत्त्वाचे आहे, असे भसीन म्हणाले.'मंडळाबद्दल उपस्थित केला होता प्रश्नतीन दशकांपूर्वी नारायण मूर्ती यांनी इतर सहा जणांसोबत इन्फोसिसची स्थापना केली होती. मूर्ती व इतर काही माजी कार्यकारी अधिकाºयांनी विशाल सिक्का यांना जास्तीच्या दिल्या गेलेल्या वेतनाबद्दल तसेच माजी मुख्य आर्थिक अधिकारी राजीव बन्सल व माजी जनरल कॉन्सल डेव्हिड केनेडी यांना त्यांनी कंपनी सोडून जाताना वेतन व आर्थिक लाभ दिल्याबद्दल विचारणा केली होती.कथित गैरव्यवहारांच्या तक्रारीनंतर चौकशी संस्थांचा अहवाल जाहीर करायला इन्फोसिसच्या मंडळाने स्पष्टपणे दिलेला नकार आणि मंडळाच्या भूमिकेबद्दल काही जणांनी प्रश्न उपस्थित केला होता.