Join us  

‘आयएफआयएन’च्या कर्ज वितरणात घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 5:47 AM

आयएल अँड एफएसच्या प्रवक्ता म्हणाला की, आयएफआयएनकडून घेतलेली कर्जे थकविणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मुंबई : ‘आयएल अँड एफएस’ची उपकंपनी ‘आयएल अँड एफएस फायनान्शिअल सर्व्हिसेस’कडून (आयएफआयएन) कर्ज घेऊन ते बुडविणाऱ्या अनेक थकबाकीदारांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची तयारी आयएल अँड एफएसच्या नव्या संचालक मंडळाने चालविली आहे. या कर्ज वितरणात प्रचंड प्रमाणात घोटाळे झाल्याचे संचालक मंडळाने केलेल्या चौकशीतून समोर आले आहे.

आयएल अँड एफएसच्या प्रवक्ता म्हणाला की, आयएफआयएनकडून घेतलेली कर्जे थकविणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्याआधी थकबाकीदारांना योग्य वेळ देण्यात आला आहे. कर्ज मंजुरीचे अधिकार असलेल्या समिती सदस्यांशी संगनमत करून कर्ज मंजूर करून घेतले गेले असेल, तर त्याविरोधातही कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

आयएफआयएनच्या थकित कर्जाचा आकडा मार्च २0१८ अखेरीस १५ हजार कोटी रुपये होता. त्यातील ५0 कंपन्यांना दिलेले ७ हजार कोटी रुपये अनुत्पादक भांडवलात (एनपीए) गेले आहे. समूहात आर्थिक संकट सुरू झाल्यानंतर कर्जदारांनी परतफेड करणे हेतूत: थांबविले. त्यामुळे कुकर्जाचे प्रमाण वाढले आहे.पुरेशा हमीशिवाय दिले २ हजार कोटीकंपनीने केलेल्या कर्जाच्या छाननीतून असे दिसून आले की, १,२00 कोटी रुपयांचे कर्ज कुठल्याही तारणाविना दिले गेले आहे. २ हजार कोटी रुपयांचे कर्ज पुरेशा हमीशिवाय दिले गेले आहे. ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज योग्य जोखीम व्यवस्थापनाशिवाय दिले गेले आहे. ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज पात्र नसलेल्या दुसºयाच संस्थांकडे वळविण्यात आले आहे. २,५00 कोटी रुपयांचे कर्ज हे आधीच्या कर्जाचे एव्हर-ग्रिनिंग करण्यासाठी दिले गेले आहे.

टॅग्स :धोकेबाजी