Join us  

एसबीआयला १,३६0 कोटींचा फटका; जोखमीचा बँकिंग व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:39 AM

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) केलेल्या घोटाळ्यात देशातील सर्वांत मोठी बँक स्टेट बँक आॅफ इंडियाचे १,३६0 कोटी रुपये अडकले आहेत. आमचा नीरव मोदीशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध नसून, पीएनबीने जारी केलेल्या लेटर्स आॅफ अंडरटेकिंगमुळे आम्हाला हा फटका बसल्याचे एसबीआयने म्हटले.

कोची : नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) केलेल्या घोटाळ्यात देशातील सर्वांत मोठी बँक स्टेट बँक आॅफ इंडियाचे १,३६0 कोटी रुपये अडकले आहेत. आमचा नीरव मोदीशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध नसून, पीएनबीने जारी केलेल्या लेटर्स आॅफ अंडरटेकिंगमुळे आम्हाला हा फटका बसल्याचे एसबीआयने म्हटले.एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितले की, आमचा नीरव मोदीशी थेट संबंध नाही. तथापि, पीएनबीशी संबंध आहे. पीएनबीच्या एलओयूच्या आधारे आम्ही मोदीला २१२ दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले आहे. नीरव मोदीचा मेहुणा व या घोटाळ्यातील दुसरा आरोपी मेहूल चोकसी याच्या गीतांजली जेम्स या कंपनीशी एसबीआयचा काही प्रमाणात संबंध आहे. तथापि, या कंपनीला आम्ही फारच थोडे कर्ज दिले आहे. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कारण नाही.संपूर्ण जड-जवाहीर व दागिने उद्योगास बँकेने किती कर्ज दिले आहे, या प्रश्नावर रजनीश कुमार म्हणाले की, एकूण देशांतर्गत कर्जाच्या १ टक्क्यापेक्षा कमीकर्ज देण्यात आले आहे. जड-जवाहीर व दागिने उद्योगाला देण्यात येणाºया कर्जाबाबत बँक दक्ष असून, जोखीम व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलत आहोत. (वृत्तसंस्था)जोखमीचा बँकिंग व्यवसायएसबीआयप्रमुखांनी सांगितले की, आमची स्विफ्ट सिस्टीम आणि कोअर बँकिंग सिस्टीम एकत्रित आहे. मुळात बँकिंग हा जोखमीचा व्यवसाय आहे. जोखमींचे प्रकारही खूप आहेत. कर्ज जोखीम, परिचालन जोखीम, बाजार जोखीम आणि विदेशी चलन जोखीम, असे अनेक घटक त्यात आहेत. परिचालन जोखीम ही नेहमीच अज्ञात असते. कर्ज जोखीम मापता येते. या जोखमींचे नीट व्यवस्थापन बँकांना जमले पाहिजे. त्यासाठी दर्जेदार परिचालन व्यवस्था हवी, तसेच या व्यवस्थेचे कठोर पालन हवे.

टॅग्स :एसबीआय