Join us  

SBI ग्राहकांनो, ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदललेत, Cash काढण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

By प्रविण मरगळे | Published: February 08, 2021 8:51 AM

एसबीआयच्या एटीएममधून १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर त्यासाठी ओटीपीची गरज भासते, बँकेने ग्राहकांना १० हजारपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे.

ठळक मुद्दे SBI च्या डेबिट कार्डहोल्डर्सना आपल्या एटीएम व्यवहारांची मर्यादा माहिती असायला हवी.जर कोणी ग्राहक मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करत असेल तर त्यासाठी अतिरिक्त पैसे आकारण्यात येतील,SBI बँक ग्राहकांना एक महिन्यात सेव्हिंग खातेधारकांना ८ वेळा मोफत ही सुविधा देत असते

स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) ने ग्राहकांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे होणाऱ्या अयशस्वी व्यवहारांवर(Unsuccessful Transactions) यापुढे अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईच्या माहितीनुसार जर पुरेशी रक्कम खात्यात शिल्लक नसेल तर त्यासाठी २० रुपये आणि त्यासोबत जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. बँक नॉन फायनेंशियल ट्राजेंक्शनवरही चार्ज लावणार आहे.

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार SBI च्या डेबिट कार्डहोल्डर्सना आपल्या एटीएम व्यवहारांची मर्यादा माहिती असायला हवी. जर कोणी ग्राहक मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करत असेल तर त्यासाठी अतिरिक्त पैसे आकारण्यात येतील, अधिकच्या व्यवहारांसाठी बँकेकडून १० रुपये ते २० रुपये आणि जीएसटी शुल्क आकारण्यात येतील, ग्राहकांना या अतिरिक्त रक्कमेपासून वाचण्यासाठी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

SBI बँक ग्राहकांना एक महिन्यात सेव्हिंग खातेधारकांना ८ वेळा मोफत ही सुविधा देत असते, यातील ५ वेळा SBI एटीएममधून तर ३ वेळा इतर बँकांच्या एटीएममधून आर्थिक व्यवहार करू शकतात. गैर मेट्रो शहरांमध्ये १० वेळा पैसे काढणे-भरणे याची मोफत सुविधा पुरवण्यात येते, यातील ५ वेळा SBI मधून तर इतर ५ वेळा दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची मभा देण्यात आली आहे. एसबीआयच्या एटीएममधून १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर त्यासाठी ओटीपीची गरज भासते, बँकेने ग्राहकांना १० हजारपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे.

SBI बँकेच्या सर्व एटीएम केंद्रावर ही सुविधा २४ तास उपलब्ध आहे. बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी १ जानेवारी २०२० पासून ओटीपी आधारित सेवा सुरु केली आहे. जेव्हा ग्राहक पैसे काढण्यासाठी ATM मध्ये येतो, त्यावेळी त्याला ओटीपी विचारला जातो, हा ओटीपी ग्राहकाच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जातो, ओटीपी आधारित Cash Widrawal सुविधा फक्त SBI एटीएममध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएटीएम