Join us  

अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमानच सुलतान

By admin | Published: March 22, 2017 11:46 AM

बॉलिवडूचा दबंग स्टार सलमान खान अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्यात सर्वात पुढे आहे.

मुंबई, दि. 22 - बॉलिवडूचा दबंग स्टार सलमान खान अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्यात सर्वात पुढे आहे. सलमानने अक्षय कुमार आणि हृतिक रोशनला मागे टाकत सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. 2016-17च्या आर्थिक वर्षात सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्यांमध्ये सलमान अव्वल असून, सलमाननं या आर्थिक वर्षात 44.5 कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्स कर भरला आहे, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत फार जास्त आहे. 2015-16 मध्ये सलमानने 32.2 कोटी रुपये कर भरला होता. आकडेवारीनुसार, सलमानच्या वार्षिक उत्पन्नात 39 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तर सलमानच्या पाठोपाठ अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याच्या बाबतीत खिलाडी अक्षय कुमारानं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अक्षय कुमारनं 2016-17च्या आर्थिक वर्षात 29.5 कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. या यादीत सलमान आणि अक्षयनंतर हृतिक रोशन तिस-या क्रमांकावर आहे. हृतिकनं 2016-17च्या आर्थिक वर्षात 25.5 कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स टॅक्स म्हणून भरला असून, हे सर्व आकडे 15 मार्च 2017पर्यंतचे आहेत. अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीतून सलमान खानने सर्वाधिक कमाई केल्याचं समोर आलं आहे. मात्र ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या कराची माहिती प्राप्तिकर विभागाने अजून जाहीर केलेली नाही. एव्हढेच नव्हे तर वादग्रस्त कॉमेडी किंग कपिल शर्माच्या वार्षिक उत्पन्नातही कमालीची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कपिलच्या वैयक्तिक उत्पन्नात 206 टक्क्यांची वाढ झाली आहे. कपिलने 2016-17च्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीमध्ये 7.5 कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. तर करण जोहर हा बॉलिवूडचा असा एकमेव दिग्दर्शक आहे ज्याने टॉप 10 यादीत स्थान मिळवलं आहे. बॉलिवूड अभिनेत्रीमध्ये दीपिका पदूकोण, आलिया भट आणि करिना कपूर अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्यात आघाडीवर आहेत.