Join us

कर्णेवार स्पर्धेत साहिल चमकला

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

फोटो आहे... साहिल कराळे ...

फोटो आहे... साहिल कराळे ...
कर्णेवार स्पर्धेत साहिल चमकला
नागपूर : साहिल कराळे आणि चिन्मय काळे यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर साऊथ पॉईंट शाळेने सेंट झेव्हियर्स, वर्धमाननगरचा १० विकेटने पराभव केला. विदर्भ जिमखाना आणि नहातकर स्पोर्ट्स इन्स्टट्यिूटच्या वतीने आयोजित १० वर्षांखालील कर्णेवार क्रिकेट स्पर्धेत सेंट झेव्हियर्सने १७.१ षटकात ११६ धावा केल्या. साऊथ पॉईंटने ११७ धावांचे लक्ष्य १५.१ षटकात गाठले. साहिल कराळेने ४ चौकाराच्या मदतीने नाबाद ५१ धावा तर चिन्मय काळेने ५२ धावा केल्या. यापूर्वी सेंट झेव्हियर्सतर्फे सुयोग भागवत (३७), ताबीश शेख (१९) आणि अथर्व वरुडकर (११) यांच्याशिवाय अन्य फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही. साहिल कराळेने १८ धावा देऊन हॅट्ट्रिकसह ५ विकेट घेतल्या तर चिन्मयने १३ धावा देऊन ३ फलंदाजांना बाद केले.