Join us

डॉलरच्या तुलनेत रुपया पंचवीस पैशांनी घसरला

By admin | Updated: April 6, 2016 04:49 IST

दोन आठवड्यांपासून सुरू असलेली मजबुती संपुष्टात येताना मंगळवारी रुपया २५ पैशांनी घसरला. त्याबरोबर १ डॉलरची किंमत ६६.४६ रुपये झाली. बँका आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी

मुंबई : दोन आठवड्यांपासून सुरू असलेली मजबुती संपुष्टात येताना मंगळवारी रुपया २५ पैशांनी घसरला. त्याबरोबर १ डॉलरची किंमत ६६.४६ रुपये झाली. बँका आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाची घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.आंतरबँक विदेशी चलन (फॉरेक्स) बाजारात काल रुपया ६६.२१ वर बंद झाला होता. आज सकाळी तो नरमाईसह ६६.२५ वर उघडला. त्यानंतर तो आणखी घसरतच गेला. सत्राच्या अखेरीस तो ६६.४६ वर बंद झाला. २५ पैसे अथवा 0.३८ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. गेल्या दोन आठवड्यात रुपयाने ५0 पैशांची वाढ नोंदविली होती. ही वाढ 0.७५ टक्के आहे.