मुंबई : इराकमधील तणावामुळे तेलाच्या किमती वाढताच डॉलरच्या तुलनेत रुपया ३९ पैशांनी घसरला. त्याबरोबर रुपया ६0 च्या टप्प्याच्या खाली आला आहे.आंतरबँकीय विदेशी चलनविनिमय बाजारात आज रुपयाची किंमत एका डॉलरला ६0.१६ रुपये अशी झाली. काल रुपयाची किंमत एका डॉलरला ५९.७७ रुपये अशी होती. आज सकाळी बाजार उघडला तेव्हा रुपयाची सुरुवातच ५९.८२ अशी कमजोर होती. त्यानंतर तो लगेच एका डॉलरला ५९.८0 रुपये अशा पातळीवर घसरला. नंतर तो घसरतच राहिला. एका टप्प्यावर एक डॉलरची किंमत ६0.२३ रुपये झाली होती. नंतर काही पैशांची सुधारणा होऊन एक डॉलरची किंमत ६0.१६ रुपये झाली. या घडामोडीत रुपयाने ३९ पैसे आज गमावले. ही घसरण 0.६५ टक्के आहे. गेल्या शुक्रवारी रुपया ५२ पैशांनी कोसळला होता. त्या आधी ५ मे रोजी एक डॉलरला ६0.२१ रुपये असा नीचांक रुपयाने गाठला होता. (प्रतिनिधी)
रुपया ३९ पैशांनी घसरला
By admin | Updated: June 16, 2014 22:35 IST