Join us

रुपया ३८ पैशांनी घसरला

By admin | Updated: October 29, 2015 21:24 IST

महिनाअखेरमुळे विदेशात आलेली मजबुती आणि काही बँका व आयातदारांकडून मागणी वाढल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी ३८ पैशांनी कोसळला

मुंबई : महिनाअखेरमुळे विदेशात आलेली मजबुती आणि काही बँका व आयातदारांकडून मागणी वाढल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी ३८ पैशांनी कोसळला. गेल्या तीन आठवड्यांतील ही त्याची मोठी घसरण आहे.व्यवहार सुरू झाले त्यावेळी डॉलर ६५.१५ रुपयांवर होता. आदल्या दिवशी आंतरबँक विदेशी चलन व्यवहार बंद झाले त्यावेळी त्याची किंमत ६४.९३ रुपये होती. त्यानंतर रुपया घसरत गेला व बँक बंद होताना डॉलर ६५.३१ रुपयांवर आला.३८ पैशांचा तोटा हा ०.५९ टक्के आहे. ६ आॅक्टोबर २०१५ रोजी डॉलरचा भाव ६५.४१ रुपये होता.दिवसभराच्या व्यवहारात डॉलर ६५.१२ ते ६५.३१ या दरम्यान फिरत होता. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने येत्या डिसेंबरमध्ये व्याजदरात वाढ करण्यासाठी दार उघडे ठेवल्यामुळे विदेशातील बाजारात बुधवारी अमेरिकन डॉलर वाढलाहोता.