Join us  

‘चिल्लर’ पैशातून जमा झाले बँकांत २६0 कोटी रुपये

By admin | Published: March 19, 2016 2:23 AM

आपण आपल्या खात्यातून प्रत्येक वेळी पैसे काढताना किंवा जमा करताना किरकोळ चिल्लर रक्कम खात्यातच ठेवतो. अशा किरकोळ रकमेचे रूपांतर कोट्यवधी रुपयांत झाले

नवी दिल्ली : आपण आपल्या खात्यातून प्रत्येक वेळी पैसे काढताना किंवा जमा करताना किरकोळ चिल्लर रक्कम खात्यातच ठेवतो. अशा किरकोळ रकमेचे रूपांतर कोट्यवधी रुपयांत झाले आहे. ही रक्कम जवळपास २६0 कोटी रुपये असून, त्याचा वापर ‘दिव्यांग’ लोकांसाठी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांच्या अध्यक्षतेखालील ट्रस्ट या पैशाचा विनियोग निश्चित करील.गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या स्वावलंबन हेल्थ इन्शुअरन्स स्कीमनुसार १८ ते ६५ वयादरम्यानच्या ‘दिव्यांग’ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याची कक्षा वाढवून शून्य ते ६५ वर्षे करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत व्यक्ती, त्याची पत्नी आणि दोन मुलांना ठेवण्यात आले आहे. याशिवाय लाभार्थीला केवळ १0 टक्के योगदान द्यावे लागणार आहे. उर्वरित योगदान ट्रस्ट करेल. (वृत्तसंस्था)