शिवाजी महाविद्यालयात विधी साक्षरता प्रशिक्षण शिबिर
By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST
आकोट : नामदार मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार किमान समान कार्यक्रम २०१४ अंतर्गत तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ आणि श्री शिवाजी महाविद्यालय आकोट यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता प्रशिक्षण शिबिर २७ ऑगस्ट रोजी झाले.
शिवाजी महाविद्यालयात विधी साक्षरता प्रशिक्षण शिबिर
आकोट : नामदार मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार किमान समान कार्यक्रम २०१४ अंतर्गत तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ आणि श्री शिवाजी महाविद्यालय आकोट यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता प्रशिक्षण शिबिर २७ ऑगस्ट रोजी झाले.शिबिराच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती दिलीप मालवीय तर प्रमुख अतिथी न्यायमूर्ती विलास मोरे, ॲड. गजानन बोचे, ॲड. महेश देव, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. सुनील पांडे यांची उपस्थिती होती. यावेळी न्यायमूर्ती विलास मोरे यांनी शिक्षण अधिकार, ॲड. शिल्पा धर्माधिकारी यांनी रॅगिंग प्रतिबंध कायदा, ॲड. योगेश धुरंधर यांनी सायबर कायद्यासंबंधी तर परिविक्षा कायद्यासंदर्भात ॲड. देव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण करताना न्यायमूर्ती मालवीय यांनी कायद्याच्या पालनाने मानवाचे जीवन सुस होते. सर्वांनीच कायद्याचे पालन करावे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. पांडे, संचालन ॲड. दीपाली येवतकार तर आभारप्रदर्शन ॲड. बोचे यांनी केले. कार्यक्रमाला पिंपळकर, प्रा. अविनाश पवार, प्रा. प्रवीण बोंद्रे, प्रा. गजानन खारोळे, किशोर लाघे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)फोटो : ३०एकेटीपी०९.जेपीजी