Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेचे व्याजदर ‘जैसे थे’ राहणार

By admin | Updated: July 24, 2015 00:07 IST

पतधोरणाचा आगामी आढावा घेताना भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता आहे. तथापि, मार्च २०१६ पर्यंत धोरणात्मक दरात

नवी दिल्ली : पतधोरणाचा आगामी आढावा घेताना भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता आहे. तथापि, मार्च २०१६ पर्यंत धोरणात्मक दरात ०.५-०.७५ टक्के घट करण्याची शक्यता आहे, असा अंदाज मॉर्गन स्टॅनली या संस्थेने व्यक्त केला आहे.भारतीय रिझर्व्ह बँक ४ आॅगस्ट रोजी पतधोरणाचा आढावा घेणार आहे. मॉर्गन स्टॅनली ही गुंतवणूक क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीने असे म्हटले आहे की, जून महिन्यात किरकोळ महागाईच्या मुख्य दरात आणि ग्राहक मूल्यांक निर्देशांकात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आगामी आढावा घेताना व्याजदरात बदल करणारनाही.रिझर्व्ह बँकेला मान्सूनची स्थितीही विचारात घ्यावी लागणार आहे. किरकोळ मूल्यांक निर्देशांक आधारित महागाई दर पुढील वर्षअखेर कमी होऊन ४.९ टक्क्यांवर येईल, अशी आशा मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रमुख व्याजदरात ०.५ ते ०.७५ टक्के घट करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेला वाव मिळेल.