Join us  

श्रीलंका सरकारला हवे रिझर्व्ह बँकेचे साहाय्य

By admin | Published: January 26, 2015 3:50 AM

श्रीलंकेतील नव्या सरकारला माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांच्या कार्यकाळात झालेल्या काळ्या पैशाच्या कथित व्यवहाराबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेची मदत हवी आहे

कोलंबो : श्रीलंकेतील नव्या सरकारला माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांच्या कार्यकाळात झालेल्या काळ्या पैशाच्या कथित व्यवहाराबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेची मदत हवी आहे. विविध घटकांकडून परदेशात जमा अब्जावधी डॉलरच्या रकमेचा शोध घेण्यासाठी श्रीलंकेला रिझर्व्ह बँकेची ही मदत पाहिजे. रिझर्व्ह बँकेसह विदेशी व आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेण्यासाठी श्रीलंकन सरकार प्रयत्नशील आहे.श्रीलंका सरकारशी संबंधित उच्च स्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नव्या सरकारने विदेशात ठेवण्यात आलेल्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक बँक व भारतीय रिझर्व्ह बँकेकडे मदत मागितली आहे. वरिष्ठ पदांवर राहिलेल्या लोकांनी ‘अब्जावधी डॉलर’ विदेशी खात्यांत जमा केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशी साठी सरकारला मदत हवी आहे.