Join us

बँक इच्छुकांचा इतिहास रिझर्व्ह बँकेने मागविला

By admin | Updated: July 26, 2015 23:03 IST

जवळपास चार डझन कंपन्यांनी छोट्या बँका सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे परवाना मागितला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने आयकर

नवी दिल्ली : जवळपास चार डझन कंपन्यांनी छोट्या बँका सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे परवाना मागितला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने आयकर विभागाने कर मुद्दा समोर ठेवून या कंपन्यांचा खरेपणा पडताळून बघावा, असे सांगितले आहे.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतेच प्रत्यक्ष कर मंडळाला पत्र लिहून तातडीने देशात आणि परदेशात कारभार असलेल्या या कंपन्यांची सूत्रे हाती असणाऱ्यांची माहिती गोळा करून रिझर्व्ह बँकेला पाठवावी, असे म्हटले. रिझर्व्ह बँकेने ज्यांनी बँका सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केले आहेत अशा ५० कंपन्यांचे मालक, वरिष्ठ कार्यकारी यांचे आर्थिक व्यवहार आणि त्यांचा करांचा इतिहास याची माहिती मागविली आहे.बँक सुरू करण्यासाठी ज्यांनी अर्ज केले आहेत त्यात इंटेलकॅश मायक्रो फिनान्स नेटवर्क कंपनी प्रायव्हेट लि., एसकेएस मायक्रो फिनान्स लि., कॅपिटल लोकल एरिया बँक लिमिटेड, इलेक्ट्रोनिका फिनान्स लिमिटेड, रेपको मायक्रो फिनान्स लिमिटेड, एसई इनव्हेस्टमेंटस् लिमिटेड, आरजीव्हीएन (नॉर्थ ईस्ट) मायक्रो फिनान्स लिमिटेड, उज्जीवन फिनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. आणि अशिका ग्लोबल सिक्युरिटीज प्रा. लि. आदी. रिझर्व्ह बँकेकडे ७२ अर्ज छोट्या फिनान्स बँक (ठेवी स्वीकारणाऱ्या व कर्ज देणाऱ्या)परवान्यासाठी व ४१ अर्ज पेमेंट बँक (कर्ज देण्याची परवानगी नसलेल्या परंतु विविध माध्यमातून पैसे अदा करू शकतील) सुरू करण्यासाठी करण्यात आले आहेत.