Join us  

फसवणुकीची प्रकरणे दाखल करण्यासाठी नोंदणी कार्यालय

By admin | Published: March 29, 2015 11:23 PM

फसवणुकीच्या प्रकरणात खटले दाखल करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या रचनेला अंतिम रूप दिले असून लवकरच याबाबत

नवी दिल्ली : फसवणुकीच्या प्रकरणात खटले दाखल करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या रचनेला अंतिम रूप दिले असून लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. या कार्यालयामुळे कर्जफेड न करणाऱ्यांच्या माहितीची देवाणघेवाण केली जाईल, पर्यायाने बँकांना बुडीत कर्जाचा प्रश्न सोडविण्यास मदत मिळेल.बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा यांनी सांगितले की हा विभाग रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली काम करील व बँकांना फसविणाऱ्या संस्थांसंदर्भातील माहितीची तातडीने देवाणघेवाण करील. सध्या बँका त्यांच्या कर्जाची परतफेड न करणाऱ्यांची नावे वृत्तपत्रांत व संकेतस्थळावर प्रकाशित करीत आहेत. हे कार्यालय कार्यान्वित झाल्यावर ही सगळी माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. बँक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या माहितीची खातरजमा या कार्यालयाच्या माध्यमातून करून घेऊ शकेल.