Join us

प्रादेशिकसाठी इलेक्ट्रोहोमिओपॅथींच्या मेळाव्यात चार ठराव जेनेरिक औषधांचा वापर करणार

By admin | Updated: June 21, 2014 00:15 IST

२१ सीटीआर ०५

२१ सीटीआर ०५
जळगाव : महाराष्ट्र इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सक असोसिएशनतर्फे स्त्री भू्रणहत्या प्रतिबंध, रक्तदान चळवळ, गरिबांसाठी जेनेरिक औषधीचा वापर आणि इलेक्ट्रोहोमिओपॅथीची प्रॅक्टीस करण्याबाबतचे चार ठराव जिल्हा मेळाव्यात करण्यात आले.
आयएमए सभागृहात शुक्रवारी राज्य प्रमुख डॉ.महेंद्र इंगळे, परभणी येथील डॉ.प्रकाश कुर्‍हे यांची उपस्थिती होती. सुरुवातील जिल्हा प्रमुख डॉ.संजय जैन यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ.प्रकाश कुर्‍हे यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून इलेक्ट्रोहोमिओपॅथीची प्रॅक्टिस कशी करावी, रोगाचे निदान व उपचार कसे करावे, केस हिस्ट्री व केसपेपर कसे तयार करावे याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.इंगळे यांनी सेंट्रल कौन्सिल व स्टेट कौन्सिल यांच्याकडे इलेक्ट्रोहोमिओपॅथी डॉक्टरांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. या मेळाव्यात चार महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. त्यात स्त्री भू्रण हत्येला प्रतिबंध करणे, रक्तदान चळवळ वाढावी यासाठी जनजागृती करून तसेच त्यात सक्रिय सहभाग घेणे, गरीब रुग्णांसाठी जेनेरिक औषधी वापराबाबत जनजागृती करणे आणि सवार्ेच्च न्यायालयाने इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या प्रॅक्टिसबाबत दिलेल्या आदेशानुसार कामकाज करण्याचे ठराव करण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ.संजय जैन यांनी तर आभार डॉ.महेंद्र इंगळे यांनी मानले. यावेळी डॉ.नंदकिशोर वाणी, डॉ.सूर्यभान पाटील, डॉ.आर.आर. महाजन, डॉ.नितीन भोगे, डॉ.वडनेरे यांच्यासह जिल्हाभरातील १५० डॉक्टर उपस्थित होते.