Join us  

‘सरकारच्या उसनवाऱ्या कमी झाल्यास रोखे बाजारास लाभ’

By admin | Published: February 22, 2017 12:36 AM

सरकारच्या उसनवाऱ्या ५.८0 लाख कोटींवरून ३.४८ लाख कोटींपर्यंत कमी करण्याची घोषणा यंदाच्या

कोलकाता : सरकारच्या उसनवाऱ्या ५.८0 लाख कोटींवरून ३.४८ लाख कोटींपर्यंत कमी करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याचा फायदा रोखे बाजाराला होईल, असे सेबीने म्हटले आहे. सेबीचे पूर्णवेळ सदस्य जी. महालिंगम यांनी असोचेमच्या परिसंवादात सांगितले की, अर्थसंकल्पीय घोषणेनुसार सरकारने उसनवाऱ्यांत कपात केल्यास सरकारचा बोजा २ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेने कमी होईल. ही बाब कॉर्पोरेट रोखे बाजारासाठी फायदेशीर आहे. सरकार आपल्या उसनवाऱ्या रोखे विकून भागविते. सरकार उसनवाऱ्या कमी करणार याचाच अर्थ सरकारचे कमी रोखे बाजारात येतील. याचा थेट लाभ कॉर्पोरेट रोख्यांना होईल.