Join us  

लग्नसराईच्या खरेदीने सोन्याला अल्प दिलासा

By admin | Published: March 05, 2015 12:05 AM

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात लग्नसराईच्या खरेदीने सोन्याच्या भावात सुधारणा नोंदली गेली आहे.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात लग्नसराईच्या खरेदीने सोन्याच्या भावात सुधारणा नोंदली गेली आहे. सोन्याचा भाव १० रुपयांनी वाढून २७,०६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तथापि, चांदीचा भाव २०० रुपयांच्या घसरणीने ३६,८०० रुपये प्रतिकिलो राहिला. जागतिक बाजारात तेजीचा कल आहे. यामुळे स्थानिक बाजार धारणेस बळकटी मिळाली. परिणामी, सोन्याचा भावात किरकोळ वाढ नोंदली गेली आहे. देशांतर्गत बाजाराचा कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.५ टक्क्याने वाढून १,२०९.१२ डॉलर प्रतिऔंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १० रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,०६० रुपये व २६,८६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात काल २५० रुपयांची घसरण झाली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला.तयार चांदीचा भाव २०० रुपयांनी घसरून ३६,८०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हराचा भावही ४०० रुपयांनी कोसळून ३६,३०० रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५९,००० रुपये व विक्रीसाठी ६०,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)