Join us  

मोठ्या कर्जांसाठी आता रेड फ्लॅग, अलर्ट सिस्टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:47 AM

आधी विजय मल्ल्या, त्यानंतर नीरव मोदी आणि रोटोमॅकचे बँकेचे कर्ज प्रकरण... सरकार भविष्यात अशा घोटाळ्यांना टाळण्यासाठी मोठ्या औद्योगिक घराण्यांना किंवा गटांना मोठ्या रकमांचे कर्ज देण्यासाठी नवे नियम तयार करणार आहे

संतोष ठाकूरनवी दिल्ली : आधी विजय मल्ल्या, त्यानंतर नीरव मोदी आणि रोटोमॅकचे बँकेचे कर्ज प्रकरण... सरकार भविष्यात अशा घोटाळ्यांना टाळण्यासाठी मोठ्या औद्योगिक घराण्यांना किंवा गटांना मोठ्या रकमांचे कर्ज देण्यासाठी नवे नियम तयार करणार आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचे असेल ते रेड फ्लॅग आणि अलर्ट सिस्टीम.या अंतर्गत एक निश्चित रक्कम कोणत्याही औद्योगिक घराण्याला कर्ज म्हणून देताच, त्या विशेष लोकांना अलर्ट जाईल, ज्यांना बँकेने अलर्ट समूहात सहभागी करून घेतले आहे. याशिवाय त्या लोकांनाही रेड फ्लॅग जाईल. तो हे दाखवेल की अमूक एक कंपनी किंवा व्यक्तीला विशिष्ट सीमेपर्यंतचे कर्ज दिले गेले आहे. यातून बँकिंग व्यवस्थेत एक पारदर्शकता येऊन जबाबदारीही निश्चित होईल.अर्थ खात्याच्या बँकिंग विभागातील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, सतत होणाºया कर्जबुडवेगिरीच्या घटनांमुळे बँकांना रेड फ्लॅग आणि अलर्ट सिस्टीम लागू करण्यावर दिशा-आदेश बनवले जातील. यात बँकेच्या अधिकाºयांच्या एका समूहाला सहभागी करून घेतले जाईल. त्यातून बँकेच्या शाखेचे किंवा सर्कलचे काही अधिकारी आपल्या पातळीवर कोणतीही संदिग्ध प्रकरणे स्वीकारू शकणार नाहीत. याशिवाय कोणत्याही कर्जाला मंजुरी आणि त्यावर घेतल्या गेलेले निर्णय किंवा अ‍ॅक्शन टेकन रिपोर्टही या समूहाला दिला जाईल. त्यातून संबंधिताची कर्ज फेडण्याची क्षमता किती आहे, हेही लक्षात येईल.लेटर आॅफ अंडरटेकिंगद्वारे दिल्या जाणाºया कर्जासाठी खासगी लेखापरीक्षकासहित कॅग प्रमाणित लेखापरीक्षकही नेमण्याबाबत विचार केला जात आहे. सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन (स्विफ्ट) दिवसअखेर जारी करण्याचीही तयारी आहे. यानुसार कर्जमंजुरी प्रकरणात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडील अधिकार तिसºयाच अधिकाºयाकडे दिले जातील.

टॅग्स :बँकनीरव मोदी