Join us  

बँकांच्या बुडित कर्जाची स्थिती आणखी बिघडण्याची आरबीआयला भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 6:33 AM

उद्योजकांनी बुडवलेल्या कर्जाने त्रस्त अशा बँकिंग क्षेत्राची स्थिती चालू आर्थिक वर्षात आणखी बिघडण्याची भीती रिझर्व्ह बँकेनेच मंगळवारी जाहीर केलेल्या वित्तीय स्थिरता अहवालात व्यक्त केली आहे.

मुंबई : उद्योजकांनी बुडवलेल्या कर्जाने त्रस्त अशा बँकिंग क्षेत्राची स्थिती चालू आर्थिक वर्षात आणखी बिघडण्याची भीती रिझर्व्ह बँकेनेच मंगळवारी जाहीर केलेल्या वित्तीय स्थिरता अहवालात व्यक्त केली आहे.देशातील शेड्युल्ड व्यावसायिक बँकांमधील बुडीत कर्जाचे (एनपीए) प्रमाण ११.६ वरून १२.३ टक्क्यांवर जाण्याची भीती आरबीआयने व्यक्त केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ११ बँकांच्या एनपीएमध्ये२१ वरून २२.३ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता आहे. त्यापैकी ६ बँकांचे आर्थिक तरलता प्रमाण आवश्यक असलेल्या ९ टक्क्यांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. बँकांना संकटकाळी सावरता यावे यासाठी राखून ठेवलेल्या जोखिम निधीतही ०.७ टक्के घट होण्याची शक्यता आहे.२१ पैकी १८ सरकारी बँकांचे २०१७-१८ चे निकाल घोषित झाले आहेत. त्यापैकी १६ बँकांना एनपीएपोटी भरमसाठ तरतूद करावी लागल्याने तोटा सहन करावा लागला आहे. अशीच स्थिती २०१८-१९ या आर्थिक वर्षात शेड्युल्ड व्यावसायिक बँकांची होऊन एनपीएच्या तरतुदीमुळे त्यांच्या नफ्यात घट होईल, असे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे