Join us

‘पतधोरणात व्याजदर कायम राहणार’

By admin | Updated: July 25, 2014 00:45 IST

रिझव्र्ह बँक पुढील महिन्यात सादर करणा:या पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता भारतीय स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : रिझव्र्ह बँक पुढील महिन्यात सादर करणा:या पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता भारतीय स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केली आहे. नाबार्डद्वारा आयोजित एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्या येथे पत्रकारांशी बोलत होत्या.
आरबीआयच्या पतधोरण आढाव्याबाबतच्या अपेक्षांसंदर्भात विचारले असता भट्टाचार्य म्हणाल्या की, बँकिंग क्षेत्रच्या अनेक गरजा आहेत. मात्र, सध्या कर्ज प्रकरणांत वाढ नसल्याने तात्काळ कोणतीही गरज भासत नाही. आगामी दिवसांत मात्र निश्चितपणो भांडवलाची गरज भासणार आहे.
रिझव्र्ह बँक येत्या 3 ऑगस्ट रोजी द्विमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. जूनमध्ये जाहीर झालेल्या पतधोरणावेळी आरबीआयने कोणताही बदल केला नव्हता. आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्याजदरात कोणताही बदल न करण्याची ही दुसरी वेळ होती.
 (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4रिझव्र्ह बँकेचा अल्प काळासाठीचा रेपोदर सध्या आठ टक्के असून, रोख राखिवता प्रमाण अर्थात सीआरआर 4 टक्के आहे. 
4ंआर्थिक वाढीला चालना देण्यासाठी व्याजदर कमी करणो आवश्यक आहे. तथापि तूर्तास ते शक्य दिसत नाही.