राऊरकेला (ओडिशा) : चीनवर मात करून जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनण्यासाठी भारताने आपले पोलाद उत्पादन वाढविले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राऊरकेला येथे सेलच्या राऊरकेला पोलाद प्रकल्पाचा १२००० कोटी रुपये खर्चाचा विस्तारित संच राष्ट्राला अर्पण करताना मोदी बोलत होते.मोदी म्हणाले की, पोलाद उद्योगाने जगात अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी उत्पादन वाढविले पाहिजे आणि जगाला आकर्षित करेल. भारताने अमेरिकेला मागे टाकलेले आहे. पण चीन अद्याप आपल्या पुढे आहे. या विस्तारित प्रकल्पाअंतर्गत वार्षिक उत्पादन क्षमता दोन दशलक्ष टनावरून वाढवून ४.४ दशलक्ष टनापर्यंत वाढविण्यात आलेली आहे. (वृत्तसंस्था)
पंतप्रधानांच्या हस्ते राऊरकेला पोलाद प्रकल्पाचे लोकार्पण
By admin | Updated: April 2, 2015 06:09 IST