Join us

रेनकोटच्या ३०० नव्या डिझाईन्स

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

पाऊसधारांपासून संरक्षण देणाऱ्या रेनकोटच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या ‘झील’ कंपनीने यंदाच्या पावसाळ््याकरिता अनेक नवीन डिझाईन्स बाजारात सादर केली आहेत.

मुंबई : पाऊसधारांपासून संरक्षण देणाऱ्या रेनकोटच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या ‘झील’ कंपनीने यंदाच्या पावसाळ््याकरिता अनेक नवीन डिझाईन्स बाजारात सादर केली आहेत. १९९५ पासून भारतीय बाजारात कार्यरत असलेल्या आणि रेनकोट निर्मितीमधील अग्रणी ब्रॅन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘झील’ कंपनीने आपल्या विविध उत्पादनांची नवीन डिझाईन्स बाजारात आणलीआहेत. लहान मुले-मुली, पुरूष, महिला अशा सर्व वयोगटासाठी कंपनीने ३०० पेक्षा जास्त डिझाईन्स सादर केली आहेत. उत्तम गुणवत्ता, डिझाईन आणि संशोधनाच्या माध्यमातून नवीन उत्पादने सादर करण्यावर दिलेला भर यामुळे कंपनीच्या उत्पादनाला सातत्याने मागणी वाढत आहे. तसेच, ग्राहकांची वाढती मागणी पुरी करण्यासाठी कंपनीने आपल्या उत्पादन क्षमतेतही वाढ करत आता कंपनीची क्षमता दिवसाकाठी २० हजार नग तयार करणे, इतकी झाली आहे. (प्रतिनिधी)