Join us  

‘रेल नीर’ खुल्या बाजारात; नागपूर, नाशिकसह ७ नवे प्लांट, दररोज ७२ हजार लीटर पॅकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:43 AM

रेल्वे प्रवासात यात्रेकरूंची तहान भागविणारे ‘रेल नीर’ हे पिण्याचे शुद्ध पाणी आता खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बाटलीबंद पाण्याच्या मोठ्या ब्रँडला टक्कर देण्यासाठी ‘रेल नीर’ला विकसित करण्याची तयारी सरकार करत आहे.

- नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात यात्रेकरूंची तहान भागविणारे ‘रेल नीर’ हे पिण्याचे शुद्ध पाणी आता खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बाटलीबंद पाण्याच्या मोठ्या ब्रँडला टक्कर देण्यासाठी ‘रेल नीर’ला विकसित करण्याची तयारी सरकार करत आहे. यासाठी देशात सात प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यातील प्रत्येकी एक प्रकल्प नागपूर व नाशिकमध्येही उभारणार आहे. नागपुरातील प्रकल्पात आॅक्टोबरमध्ये उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.या प्रकल्पातून प्रतिदिन ७२ हजार लीटर बाटलीबंद पाण्याचे उत्पादन होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात नवे प्रकल्प तिरुवनंतपूरम, अहमदाबाद, नागपूर, विजयवाडा, नाशिक आणि फरक्का येथे उभारण्यात येत आहेत. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड’ला यासाठी ‘रेल नीर’ ब्रँड अंतर्गत प्रकल्प उभारणीचे अधिकार सरकारने दिले आहेत.बाजारातील मागणी पूर्ण करणारसार्वजनिक क्षेत्रातीलया उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातीलअंबरनाथ, बिहारमधील दानापूर, दिल्लीच्या नागलोई, तामिळनाडूच्या पालूर, उत्तर प्रदेशच्या अमेठी आणिकेरळात अशा06ठिकाणी प्रकल्प चालविण्यात येत आहेत.7000 रेल्वे स्टेशन देशातील व १००० रेल्वेंमध्ये ‘रेल नीर’ हे शुद्ध पाणी विकले जाते.एकूण मागणीच्या२० टक्केच पुरवठा सद्या करण्यात येत आहे.नवे प्रकल्प सुरू झाल्यानंतर, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे की, आयआरसीटीसी ही मागणी पूर्ण करून खुल्या बाजारपेठेत हा ब्रँड उपलब्ध करू शकते.१५ रुपये आणि १० रुपयांना मिळणाºया एक आणि अर्धा लीटर पाण्याच्या बाटलीमागे आयआरसीटीसीला एक ते दीड रुपये नफा होतो. एकूण उत्पन्नाच्या १० टक्के उत्पन्न हे पाणी विक्रीतून होते.