नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी एअरटेलने सहा सर्कलमध्ये व्हिडिओकॉनचे १८०० मेगाहर्ट बँडचे स्पेक्ट्रम ४४२८ कोटी रुपयांत खरेदी केले आहेत. एअरटेलतर्फे मुंबई शेअरबाजारात ही माहिती देण्यात आली. त्यात म्हटले आहे की, भारतीय एअरटेलने याबाबत व्हिडिओकॉनशी समझोता केला आहे. ४४२८ कोटी रुपयांच्या रकमेचा हा समझोता आहे. त्यानुसार सहा सर्कलमध्ये १८०० मेगाहर्टस् बँडचे स्पेक्ट्रम वापरण्याचा एअरटेलला अधिकार मिळाला आहे.
एअरटेलकडूृन स्पेक्ट्रमची खरेदी
By admin | Updated: March 18, 2016 02:05 IST