Join us  

बँकांच्या विलीनीकरणाच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी उद्या संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 1:20 AM

बँकांच्या विलीनीकरणाच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका २२ आॅगस्ट रोजी संप करणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बहुतेक बँकांनी आपल्या ग्राहकांना या संपाची कल्पना दिली आहे.

 नवी दिल्ली : बँकांच्या विलीनीकरणाच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका २२ आॅगस्ट रोजी संप करणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बहुतेक बँकांनी आपल्या ग्राहकांना या संपाची कल्पना दिली आहे.आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस आणि कोटक महिंद्र बँकेचे कामकाज धनादेशांचे क्लीअरन्स वगळता नेहमीप्रमाणे सुरू असेल. आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फेडरेशन, आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्ससह नऊ संघटनांची एकत्रित संस्था द युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने या संपाची हाक दिली आहे.मुख्य कामगार आयुक्तांकडील बैठकीतून काहीही तोडगा निघालेला नाही, सरकार किंवा बँक व्यवस्थापनाकडून कोणतेही आश्वासन न मिळाल्यामुळे संप करण्याशिवाय आमच्यासमोर काहीही पर्याय राहिलेला नाही, असे एआयबीओसीचे सरचिटणीस डी. टी. फँ्रको यांनी सांगितले.कंपन्यांकडून परतफेड न होणारे कर्ज वसूल न होणारे म्हणून जाहीर करण्याचे धोरण बंद करावे, हेतूत: कर्ज न फेडणे हा फौजदारी गुन्हा ठरवावा आणि वसूल न होणाºया कर्जाच्या वसुलीबाबत संसदीय समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आदीही मागण्यांसाठी हा संप असल्याचे एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले.