Join us  

मालमत्तेची जप्ती बेकायदा - चोकसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:23 AM

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माझ्याविरुद्ध लावलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असून, ईडीने बेकायदेशीररीत्या माझी संपत्ती जप्त केली आहे

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माझ्याविरुद्ध लावलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असून, ईडीने बेकायदेशीररीत्या माझी संपत्ती जप्त केली आहे, असा आरोप पंजाब नॅशनल बँकेतील १४ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील एक आरोपी मेहुल चोकसी याने केला आहे.एका वृत्तसंस्थेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत त्याने हा आरोप केला. बनावट कंपन्या स्थापन केल्याचा आरोप फेटाळताना चोकसीने म्हटले की, माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. ईडीने माझी मालमत्ता बेकायदेशीररीत्या जप्त केली आहे. जप्तीला कोणताही आधार नाही. १६ फेब्रुवारी रोजी माझा पासपोर्ट रद्द करण्यात आल्यामुळे मला फिरणे अशक्य झाले आहे.