Join us  

नोटांच्या छपाईचे काम रात्रंदिवस सुरू; २00 व ५00च्या नोटांवर आता भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:26 AM

नोटाटंचाईमुळे देशाच्या अनेक भागांतील एटीएम बंद आहेत.

नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व नोटाटंचाईवर मात करण्यासाठी सरकारने चारही छापखान्यांमध्ये रात्रंदिवस म्हणजेच २४ तास आणि आठवड्यांचे सातही दिवस नोटा छपाई सुरू केली आहे.नोटाटंचाईमुळे देशाच्या अनेक भागांतील एटीएम बंद आहेत. बँकांमधूनही पुरेशी रोख रक्कम मिळेनाशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या सुरुवातीपासून सरकारने छापखाने रात्रंदिवस नोटा छपाईच्या कामाला जुंपले आहेत. ५०० आणि २००च्या नोटा येथे छापल्या जात आहेत. देशात सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या नोटांची टंचाई असल्याचे जाणकारांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, सिक्युरिटी प्रिंटिंग अ‍ॅण्ड मिंटिंग कॉर्पोरेशनआॅफ इंडिया लिमिटेड (एसपीएमसीआयएल) ही सरकारी संस्था देशात चार छापखाने चालविते. या छापखान्यांत दररोज १८ ते १९ तास काम चालते. ३ ते ४ तास यंत्रांना आराम दिला जातो. तथापि, नोटाटंचाई निर्माण झाल्यापासून ही यंत्रे २४ तास सुरू आहेत.रीकॅलिबरेशन गरजेचेरिझर्व्ह बँकेने मंगळवारी म्हटले होते की, आपल्याकडे नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शिवाय नोटांची छपाईही वाढविण्यात आली आहे. एटीएममध्ये नोटा भरण्यासाठी सुविधांचा अभाव असल्यामुळे तसेच काही एटीएममध्ये २००च्या नोटा भरण्याची सुविधा अजूनही होऊ न शकल्यामुळे नोटांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे संबंधित एटीएमचेही रीकॅलिबरेशन करण्यात येत आहे.

टॅग्स :एटीएम