Join us

तूरडाळीचे भाव गगनाला

By admin | Updated: April 3, 2015 01:04 IST

गतवर्षी पाऊस कमी झाल्याने इतर पिकांसह डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घटले असून, यातील जीवनसत्त्वयुक्त तूरडाळीचे उत्पादन सरासरी ३५ टक्क्यांनी घटले आहे

राजरत्न सिरसाट, अकोलागतवर्षी पाऊस कमी झाल्याने इतर पिकांसह डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घटले असून, यातील जीवनसत्त्वयुक्त तूरडाळीचे उत्पादन सरासरी ३५ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे या डाळीचे भाव गगनाला भिडले असून, घाऊक बाजारात ८,५०० रुपये क्विंटलच्या वर, तर किरकोळ बाजारात १०० रुपये प्रतिकिलोच्या जवळपास दर आहेत. या दरवाढीचा ताण या वर्षी सामान्यांच्या खिशावर पडला आहे. भारतात तूर या कडधान्याचे सर्वाधिक लागवड क्षेत्र महाराष्ट्रात आहे. गतवर्षी ९३.२० लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. या वर्षी पावसाला विलंब झाल्याने, तुरीचे लागवडक्षेत्र घटले असून, ८३.२४ लाख हेक्टरपर्यंत ते खाली आले. तूर पीक मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. या वर्षी या पिकाचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित होते, पण यामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. महाराष्ट्रात १० लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड होते. २०१३-१४मध्ये हेक्टरी ८ क्ंिवटल ८१ किलो डाळीचे उत्पादन झाले; तथापि या वर्षी या उत्पादनात घसरण झाली असून, हेक्टरी केवळ ७०० किलो, म्हणजे सात क्विंटल उत्पादन झाले आहे. अपेक्षित हेक्टरी उत्पादन ११ क्ंिवटलच्या वर हवे होते, पण गतवर्षी ऐन फुलोरा, शेंगा येण्याच्या अवस्थेत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पावसाने दडी मारली होती. त्याचा फटका या पिकाला बसला. परिणामी, या डाळीचे किरकोळ बाजारातील दर १०० रुपये क्ंिवटलपर्यंत पोहोेचले. या दरवाढीचा नागरिकांच्या खिशावर ताण पडला आहे.