Join us  

पीएनबीला हवा आहे आरबीआयकडून दिलासा, तोटा चार तिमाहीत विभागण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:16 AM

नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेला १२,९०० कोटी रुपयांचा फटका बसल्यानंतर आता पीएनबीला या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून दिलासा हवा आहे. मार्च अखेरीस बँकेच्या बॅलन्सशीटवर १२,९०० कोटी रुपयांचे थकीत कर्ज ४८ हजार कोटी मूल्य असलेल्या या बँकेची बॅलन्सशीट आर्थिकदृष्ट्या खिळखिळी होईल. त्यामुळे हा तोटा चार तिमाहीत विभागण्याची मागणी बँकेने केली.

मुंबई  - नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेला १२,९०० कोटी रुपयांचा फटका बसल्यानंतर आता पीएनबीला या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून दिलासा हवा आहे. मार्च अखेरीस बँकेच्या बॅलन्सशीटवर १२,९०० कोटी रुपयांचे थकीत कर्ज ४८ हजार कोटी मूल्य असलेल्या या बँकेची बॅलन्सशीट आर्थिकदृष्ट्या खिळखिळी होईल. त्यामुळे हा तोटा चार तिमाहीत विभागण्याची मागणी बँकेने केली.बाजारातून पैसा उभा करण्याच्या बँकेच्या क्षमतेवरही परिणाम होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएनबीला असा विश्वास आहे की, आरबीआय त्यांची विनंती मान्य करेल आणि हे थकीत कर्ज चार तिमाहीत विभागला जाईल. ही पूर्ण रक्कम अद्यापही एनपीए नाही. दर तिमाहीला नफा आणि तोटा याचा आढावा घेतला जातो, पण बँकेला तो चार क्वार्टरमध्ये विभागणी करण्याचा पर्याय असतो. आरबीआयकडून पीएनबीला असा दिलासा मिळू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.या बँकेचा एनपीए (थकीत कर्ज) अगोदरच ३४ हजार कोटी रुपये आहे. त्यात नव्या आर्थिक संकटामुळे परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका कर्मचाºयाने सांगितले की, बँकेची पत जर एवढ्या गतीने कमी होत असेल, तर बाजारात बँकेला कोण पैसे देणार आहे?

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकपंजाब नॅशनल बँक घोटाळाभारतीय रिझर्व्ह बँक