Join us  

PNB Scam : गीतांजली समूहाच्या उपाध्यक्षाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 1:06 AM

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) कोट्यवधींच्या घोटाळ्यात सीबीआयने गीतांजली उद्योग समूहाचा उपाध्यक्ष विपुल चितालिया याला मुंबई विमानतळावर अटक करून वांद्रे-कुर्ला संकुलातील सीबीआय कार्यालयात आणले.

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) कोट्यवधींच्या घोटाळ्यात सीबीआयने गीतांजली उद्योग समूहाचा उपाध्यक्ष विपुल चितालिया याला मुंबई विमानतळावर अटक करून वांद्रे-कुर्ला संकुलातील सीबीआय कार्यालयात आणले.१२,६३६ कोटींचा घोटाळा नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी केला. लेटर्स आॅफ अंडरटेकिंग (एलओयू) व फॉरेन लेटर्स आॅफ क्रेडिट (एफएलसी) यांचा गैरवापर करीत हा देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा केला आहे.घोटाळा उघड होऊ नये यासाठी पीएनबीच्या अधिकाºयांनी एलओयू दस्तावेज जारी करणाºया आदेशांची नोंद अंतर्गत सॉफ्टवेअरमध्ये न करता आंतरराष्ट्रीय यंत्रणा स्विफ्टमध्ये केली होती. याशिवाय गीतांजली समूहाचे संचालक अनियत शिवरामन नायर यांच्यासह चार आरोपींना १२ दिवसांची कोठडी मिळाली आहे. सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, नायरने एलओयूसाठी अनेक अर्जांवर स्वाक्षºया केल्या. मेहुल चोक्सीच्या अन्य १९ कंपन्यांचा तो संचालक आहे. मोदीच्या कंपनीतील सहायक सरव्यवस्थापक मनीष के. बोसामिया यालाही सीबीआय कोठडी मिळाली आहे.घोटाळा २0१0 पासूननीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना लाभ मिळवून देण्यासाठी ‘लेटर्स आॅफ अंडरटेकिंग’चे (एलओयू) नियम २0१0पासून मोडण्यात येत होते, अशी माहिती सीबीआयने सोमवारी न्यायालयात दिली. आरोपींची कार्यपद्धती विशद करताना सीबीआयने सांगितले की, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी कर्जाची परतफेड कधीच केली नाही. त्यांच्या एखाद्या कंपनीला एलओयूच्या आधारे कर्ज दिले गेल्यानंतर त्याची परतफेड करण्यासाठी दुसरे एलओयू जारी केले जायचे. एलओयू देण्याचा प्रकार २0१0पासून सुरू होता.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळाअटक